कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १६ गोवंशांची सुटका

Foto
मनपाची मिटमिटा भागात कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मिटमिटा भागातील न्यू अन्सार कॉलनीत कत्तलीच्या उद्देशाने एका पत्र्याच्या शेडमध्ये निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १६ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. छावणी पोलीस आणि महानगरपालिकेच्या अवैध कत्तल विरोधी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी मुख्य आरोपी परवेज मुर्तुजा शेख (रा. न्यू अन्सार कॉलनी), इफ्तीकार अन्सार शहा, अन्सार शहा कासम शहा (दोघे रा. शहा कॉलनी, पडेगाव), अजवान कुरेशी (रा. सिल्लेखाना), शाहेद कुरेशी, वहाब कुरेशी आणि मुस्ताकिन अशा एकूण सात जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा
रोशनगेट भागात १०० किलो गोमांस जप्त
रोशनगेट भागातील मदिना बीफ शॉपमध्ये गोमांस विक्रीवर मनपाच्या अवैध कत्तल विरोधी पथकाने मंगळवारी कारवाई केली. या छाप्यात ३० हजार रुपये किमतीचे १०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी विक्रेता आसिफ कुरेशी याच्यावर जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विधिक जाधव यांनी दिली.
मिटमिटा येथील न्यू अन्सार कॉलनीतील गट नं. २५, प्लॉट नं. १५० मध्ये परवेज मुर्तुजा शेख याने पत्र्याच्या शेडमध्ये काही गोवंश कत्तलीसाठी डांबून
ठेवल्याची माहिती हवालदार श्रीराम बदणे यांना माहिती मिळाली होती. त्यावरून रविवारी (दि. ५) छावणी पोलिस आणि मनपाचे अवैध कत्तल विरोधी पथक प्रमुख बाळनाथ जनार्दन तुपे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये १६ गायी आणि गोन्हे डांबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी जनावरांची सुटका करत त्यांची रवानगी दौलताबाद जवळील सद्‌गुरू महाराज गोशाळेत केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions